Share this

चिखली ( बुलडाणा कव्हरेज बातमी)आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देऊळगाव घुबे येथील रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी म्हणून लाभलेल्या संस्थेच्या अध्यक्षा सौ वैशालीताई दीपकराव घुबे  विशेष उपस्थिती म्हणून लाभलेल्या पंचायत समिती च्या सदस्या सौ उषाताई थुट्टे पाटील त्यासोबतच कृषी सहाय्यक स्वातीताई दिनेश घुबे जानकीदेवी जुनियर कॉलेज ची माजी विद्यार्थिनी नवनिर्वाचित तलाठी कुमारी रेणुका घुबे यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता मा.जिजाऊ मासाहेब त्यासोबतच स्वर्गवासी कमलबाई शेणफड राव  घुबे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची  सुरुवात करण्यात आली.त्यानंतर प्रास्तविकते मधून सौ जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगुण महिलांचे महत्त्व विशद केले ,त्यानंतर जागतिक स्तरावरील विविध महिलांचे रूप धारण केलेल्या विद्यार्थिनींचा अनोखा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर विविध विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे महत्त्व आईचे महत्व व मुलीचे महत्त्व त्यांच्या भाषणातून विशद केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात उपस्थित सर्व महिला वर्गांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये संगीत खुर्ची ,बलून स्पर्धा , माईंड गेम,गीत गायन असे विविध स्पर्धा घेऊन महिला पालक वर्गामध्ये वेगळा उत्साह निर्माण करून प्रत्येक महिलांनी सर्व खेळांमध्ये भाग घेऊन पारितोषिक मिळवले . सौ पुनम घुबे सौ उषा काकडे सौ शीतल पूर्भे ,शीतल उसर, शीलाताई वरपे ,पार्वती घुबे, मनीषा घुबे, हर्षदा इंगळे  यांनी  विविध स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक  पटकावले . संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शेणफड घुबे तसेच विशेष उपस्थितीत असलेल्या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले विशेष उपस्थिती म्हणून लाभलेल्या सौ स्वाती दिनेश घुबे  कु.रेणुका ताई  यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांचे महत्व आजची परिस्थिती यावर प्रकाश टाकला, अध्यक्षस्थानी असलेल्या सौ, वैशाली घुबे यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे महत्व विषद करून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर श्री शेणफड राव घुबे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना  महिलांचे स्थान आज जागतिक स्तरावर काय आहे , आणि आपली पुढची दिशा काय असली पाहिजे हे  समजाऊन सांगून कार्यक्रमाचे कौतुक केले .कार्यक्रमाचे संचालन सौ अलका भोंडे मॅडम यांनी केले तर आभार प्रियंका भुतेकर  यांनी केले  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव उद्धवराव घुबे प्राचार्य अमोल घुबे व सर्व महिला शिक्षिकांनी व  शिक्षकांनी मेहनत घेऊन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न केला याबद्दल प्राचार्य अमोल घुबे यांनी सर्वांचे  आभार व्यक्त केले.

हे वाचलत का?

error: Content is protected !!