Share this
अंढेरा(नंदकिशोर देशमुख: बुलडाणा कव्हरेज बातमी):चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथून ६ मार्च रोजी अशोका बिल्डकाँन कंपनीचे
३२ लोखंडी विद्युत पोल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले .अंढेरा पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवून आरोपींना काही तासातच चतुर्भूज केले. शेळगाव आटोळ येथील पावर हाऊस मध्ये अशोका बिल्डकाँन कंपनीचे ३५ विद्युत पोल ठेवण्यात आलेले होते दिनांक ६मार्च रोजी ३५ पैकी ३२ विद्युत लोखंडी पोल अज्ञान चोरट्यांनी लांब पास केल्याची घटना ६ मार्च रोजी उघडकीस आली होती. चोरी गेलेल्या सदर लोखंडी पोल ची किंमत ३ लाख ८४ हजार असून या प्रकरणी गजानन मनोहर धंदर यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलीस स्टेशन येथे या अप न.७१/२५ कलम ३०३ (२). BNS. या गुन्ह्याची करण्यात आली. या बाबद बुलढाणा कव्हरेजने दि ९ मार्च ला या गुन्ह्याची बातमी झळकली. आणि व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा श्रीमती मनीषा कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली.अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शेक्करगे यांनी माहितीची चक्रे वेगात फिरवली व अंढेरा रा हद्दीतील MSEB चे लोखंडी पोल (अशोका बिल्डकॉन लि. नासिक) या कंपनीचे चोरी गेलेल्या अशा गंभीर मालमत्तेच्या गुन्हांतील आरोपीचा शोध घेऊन अवघ्या २४ तासात या गुन्ह्यातील आरोपींना गोपनीय माहितीच्या व तांत्रिक विषयांच्या आधारे आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेऊन आरोपीच्या कडून खालील प्रमाणे गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करून लोखंडी पोल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्यासह दुय्यम ठाणेदार सुरेश जारवाल. हे कॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे न .पि.सी. भरत पोपळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला..