Share this
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्यूज)सामान्य व्यक्ती बिमार पडल्यास तर ते सर्वात पाहिले डॉक्टर कडे धाव घेतो.डॉक्टरला लोक देव समजतात पण हाच देव कधी वासनांध झाला तर सामान्य जनतेने विश्वास तरी कुणावर ठेवावा? डॉक्टर साहेब तुम्हाला जनता देव समजत असेल आपल्या आपले कुटुंब तुमच्याकडे उपचारासाठी पाठवत असेल आणि तुम्ही वासनांध कृत्य करत असाल तर जनतेने तुमच्यावर विश्वास का म्हणून ठेवावा असा प्रश्न सध्या चिखली शहरातील नागरिक विचारत आहेत. प्रत्येक रुग्ण आणि नातेवाईकाचा देवानंतर कोणावर विश्वास असेल तर डॉक्टरवर असतो. देव जन्म देतो तर डॉक्टर जीवन वाचवितात. एखादा व्यक्ती सिरियस असेल तर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना डॉक्टर पेक्षा मोठ कुणीच नसते. जिवघेणा अपघात असो वा दुर्धर आजार, आपल्या माणसाला डॉक्टर सहि सलामत बरा करेल, ही आशा रूग्णांच्या नातेवाईकांना असते. परंतु चिखली शहरात एक घटना उघड झाली एका महिलेशी अश्लिल चाळे करताना शहरातील एका डॉक्टरांची व्हायरल क्लिपमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम झाले आहे.
चिखली शहरातील एका पप्रतिष्ठित डॉक्टराने एका महिलेसोबत केलेल्या अश्लिल कृत्यांची क्लिप मागील दोन ते तीन दिवसांपासून समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून त्या डॉक्टरांना संबंधीत महिलेच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिल्याचे समजते. विशेष म्हणजे डॉक्टरने आपल्या केबीनमध्ये करीत असलेले हे चाळे त्यांनीच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून आपल्या कार्यालयात आपणच सीसीटीव्ही लावले असल्याचा डॉक्टरांना विसर पडला होता की काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एकीकडे समाजामध्ये नैतीकता रसातळाला जात असतानाच डॉक्टरांकडे आदरयुक्त भावनेने पाहत असतो. असे असताना डॉक्टरांनी केलेल्या या कृत्यामुळे डॉक्टरांची प्रतिमा डागाळल्याचे दिसून येत आहे. एका महिलेशी अश्लिल चाळे करताना डॉक्टरची व्हिडीओ क्लिप व्हारयल झाल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, सदर महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरला चांगलाच चोप दिला असून या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे.
संबंधित डॉक्टरला समज देवू…..
जो काही सदर घडलेला प्रकार घाणेरडा असून पुन्हा असे काही चुकीचे वर्तन कोणा कडून घडणार नाही, याबाबत संबंधित डॉक्टरला समज देवू!
डॉ. संदीप वाघ, अध्यक्ष, सीएमए, चिखली.