Share this

त्या’ भाविकांना लुटणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

वैजापूर तालुक्यातील भग्गाव शिवारातील लुटमारीची घटना

वैजापूर, पुढारी वृत्तसेवाः देवदर्शनाला जाणाऱ्या परप्रांतीय भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रा.) पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने १७ फेब्रुवारी रोजी पहाटे वैजापूर तालुक्यातील भग्गाव शिव-ारात साई दर्शनाला जाणाऱ्या परराज्यातील भाविकांना चाकूचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लुटला होता. तत्पुर्वी १६ फेब्रुवारी रोजी देखील कोपरगाव हद्दीत या चोरट्यांनी अशाच एका घटनेत परप्रांतीय प्रवाशाची लूट केली होती.

विजय गणपत जाधव रा.श्रीरामपूर, सिद्धार्थ भाऊसाहेब कदम, राहुल संजय शिंगाड़े, सागर दिनकर भालेराव व समीर रामदास माळी (सर्व रा. पोहेगाव ता. कोपरगाव) या भामट्यांसह

पोलिसांनी व अन्य दोघा अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ फेब्रुवारी रोजी नागपूर-मुंबई महामार्गाने तालुक्यातील भग्गाव शिवारात शिर्डीला साई दर्शनाला जात असलेल्या परराज्यातील साई भक्तांच्या टेंपो ट्रॅव्हल्सला अज्ञात चोरट्यांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अर्टिगा कार आडवी

लावली. यावेळी आलेल्या चौघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून प्रवाशांकडून २ लाखांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी एक दिवस अगोदर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलापूर शिवारात आठ जणांनी मोहित पाटील (रा. सुरत, गुजरात) यांच्या वाहनाला गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून एक लाखांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करीत असताना त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे कोपरगाव पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी

समृध्दी महामार्गाने राज्यासह परराज्यातील भाविक, शिर्डी, वेरूळ, घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी येतात. मात्र, गेल्या काही महिन्यापासून भाविकांच्या वाहनासमोर गाड्या आडव्या लावून भाविकांची लुटमार करण्यात येत असल्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे भाविकांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. महामार्ग पोलिसांनी या मार्गावर रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

हद्दीतील चाशनळी भागात आहेत. पोलिसांनी सापळा रचून या चोरट्यांना

हे वाचलत का?

error: Content is protected !!