Share this


अमोना(बुलडाणा कव्हरेज बातमी)अमोना ते देऊळगाव घुबे रस्ता हा अवैध वाळू वाहतूकदारांना सोयीचा झाला असून रस्त्याचे काम कासवगतीने सुरु असल्याने रहदारीसाठी त्रासदायक ठरत आहे. लोकांना अनेक खस्ता खात रस्ता पार करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे ते इसरुळ रोडचे अवैध वाळू वाहतुकीमुळे वाटोळे झाल आहे. आता खडकपूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे अनेक जड वाहने रस्त्यावरून धावत आहे व त्यातच या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. हे काम गेल्या एक वर्षापासून निवेदन देऊन सुद्धा कासवाच्या गतीने सुरू आहे. आता मराठवाडा हद्दीतून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे माहिती मिळाली. पण ती अवैध वाहतूक आमोना ते देऊळगाव घुबे रोड ने सुरू आहे. त्यामुळे इसस्ळ ते देऊळगाव घुबे रस्त्यानंतर आता अमोना या रस्त्याचे वाटोळे होत आहे. त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेकांना पाठीच्या मणका त्रास होत आहे. तर अनेक वाहने खराब होत आहे. त्यामुळे रस्त्याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे झालेले दुरवस्था लवकर नीट करावी. 
                                             -: अमोना ते देऊळगाव घुबे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.त्यावर अधिकारी अजिबात लक्ष देत नाही,त्या रस्त्यावर मध्यात गिट्टी खडी मशीन आहे. रस्त्यावर त्या ठिकाणी गिट्टी चे तिप्पर चालतात,त्या रस्त्याची तेवढी क्षमता नाही,त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.त्यामुळं आमच्या गावातील अनेकांना पाठीचा त्रास होत आहे….

              गजानन इंगळे
             नागरिक अमोना

हे वाचलत का?

error: Content is protected !!