Share this

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज)

अनुराधा फार्मसीच्या रा. से. यो. विशेष श्रमसंस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन
अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, राष्ट्रीय सेवा योजना, विशेष श्रमसंस्कार शिबिराचे ३ मार्च, सोमवार रोजी दत्तकग्राम खोर, ता. चिखली येथे संस्थेचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. राहुलभाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मुंगसाजी महाराज सह सुतगिरणी चिखलीचे संचालक व सरपंचपती मा. श्री. श्री दीपकभाऊ हाके यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. विशेष श्रमसंस्कार शिबिरातून चांगले संस्कार विद्यार्थ्यांनी अंगीकृत करावे. तसेच संत गाडगेबाबा यांच्या जीवनातून श्रमाचे महत्व समजून घ्यावे, असे आवाहन श्री दीपकभाऊ हाके यांनी केले. २ मार्च ते ९ मार्च पर्यंत या शिबिराचे ‘युथ फॉर माय भारत व युथ फॉर डीजिटल लिटरसी’ या शीर्षकासह आयोजन करण्यात आलेले आहे. या उद्घाटन सोहळयाचे अध्यक्षपद अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी व हेल्थ इंस्टिीटयुट्चे प्राचार्य तथा कॅम्पस डायरेक्टर डॉ. के. आर. बियाणी यांनी भूषविले. याप्रसंगी श्री दीपकभाऊ हाके, श्री दीपकजी पांडे, श्री.सुरेश बैरागी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. सुरेश बैरागी महाराज, अध्यक्ष आदर्शगाव खोर यांनी स्वयंसेवकांना शिबिरांचे व समाजासाठी, समाजात आणी समुदायसोबत काम करण्यास मदत करणाऱ्या उपक्रमांचे महत्व पटवून दिले.
रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.डी. सगरुळे यांनी शिबिरांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चे महत्व अधोरेखित केले.
शिबिराचे अध्यक्ष मा. प्राचार्य तथा कॅम्पस डायरेक्टर  डॉ. के. आर. बियाणी यांनी रा. से. यो. शिबिरातून श्रमदान, शिस्त, सामाजिक आपुलकी, कौशल्य विकास या गोष्टी विध्यार्थ्यानमध्ये रुजतात अशी भावना व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वताच्या व ग्रामस्थांच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे असे आव्हाहन केले.
शिबिराच्या प्रस्तावनेत रा. से. यो. विध्यार्थी प्रतिनिधी विशाल गजानन वाघ याने शिबिराच्या उद्दिष्टांची उजाळणी केली.
रा. से. यो. श्रमसंस्कार शिबिराला प्राचार्य डॉ. आर. एच  काळे सर, प्राचार्य डॉ. आर. आर. पागोरे सर, मा. सौ. पुनमताई दिपक हाके, सरपंच खोर, श्री. दयानंद मोरे, उपसरपंच खोर, श्री. प्रदीप हाके, उपाध्यक्ष, हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्टाण, चिखली, श्री. राहुल सावळे, श्री.  दीपक पांडे, ग्रा.पं. सदस्य, श्री. सुरेश पवार, मा. पोलीस पाटील खोर, सामाजिक कार्यकर्ते श्री. बबनराव पांडे, श्री. बबनराव माळोदे, श्री. मंगलसिंग राजपूत, श्री. आशिष हाके, श्री. नंदराम वैष्णव, श्री. अनिल मोरे, श्री. नारायणराव माळोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवासी शिबिरादरम्यान विविध समाजउपयोगी, बौद्धिक व श्रमसंस्कार  कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. ज्यामध्ये रक्त हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी, नेत्ररोग तपासणी व उपचार, पशुरोग निदान व उपचार, ग्रामस्वच्छता असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
विशेष श्रम संस्कार उद्घाटन सोहळयाला प.रा. मौ. शि. संस्था अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. एच. काळे, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे इस्टिटयूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.आर.पागोरे यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.डी. सगरुळे, प्रा. पि.यू. वाघमोडे तसेच रा. से. यो. महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रुचा इंगळे, प्रा. स्वाती खेडेकर, श्री. विठ्ठल डुकरे व प्रतिक ठोकरे उपस्थित होते.  उद्घाटनाचे सूत्रसंचालन अभिषेक जोशी व कु. रसिका बांगडे तर आभार प्रदर्शन रा. से. यो. विध्यार्थी प्रतिनिधी प्रसन्न कुलकर्णी यांनी केले.

हे वाचलत का?

error: Content is protected !!