Share this
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज):महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने “लालमहल, पुणे ते विधानभवन, मुंबई” या मार्गावर पदयात्रा प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली आहे. ही पदयात्रा १५ मार्च ते १९ मार्च या कालावधीत पार पडणार असून, १९ मार्च रोजी हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत विधानभवनावर घेराव केले जाणार आहे.
या पदयात्रेत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व प्रभारी अजय छिकारा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, राज्याचे सहप्रभारी कुमार रोहित, एहसान खान पूर्णपणे सहभागी असतील. राज्यातील सर्व प्रमुख नेते टप्यानुसार पदयात्रेत सामील होतील.
१५ मार्च रोजी पदयात्रेची सुरुवात लालमहल पासून सुरू होईल, ज्यात विधानपरिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील व माजी मंत्री विश्वजीत कदम उपस्थित असतील.
तसेच, राज्य अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथाला सुद्धा सहभागी होतील.
अशी माहिती युवक काँग्रेसचे सरचिटणीस व संघटनप्रमुख श्रीनिवास नालमवार यांनी दिली.
आजच्या सामाजिक-राजकीय वातावरणात खालील गंभीर समस्यांवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे:
वाढलेली बेरोजगारी:
महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर वाढत असून रोजगारांच्या संधी कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं पूर्ण दुर्लक्ष झालं आहे.
राजकीय गुन्हेगारी व गुन्हेगारांना सत्ताधारी राजकीय पक्षांचा आश्रय:
राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड्स ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, राजकीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून गुन्हेगारांना अनेकदा सत्ताधारी पक्षांकडून संरक्षण मिळत असल्याचे महाराष्ट्राने बघितले आहे.
जातीयवाद व धर्मवादाला पाठिंबा:
समाजातील विभाजन आणि विरोधाभास अधिकाधिक प्रकट होत असून या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
महिला अत्याचार:
महिलांवरील हिंसाचार व अत्याचाराच्या प्रकरणांमध्येही चिंतेची बाब निर्माण झाली आहे, ज्यावर तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
शेतकर्यांच्या अडचणी या विविध प्रश्नांवर पदयात्रा काढणार आहे.
ही पदयात्रा केवळ विरोधाचा नव्हे तर या गंभीर समस्यांवर जनजागृती करण्याचा, वास्तवाची प्रतिमा उघड करण्याचा आणि समस्यांच्या मूळावर चर्चा करण्याचा आग्रह आहे.बुलढाणा जिल्ह्यातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी प्रदेश सचिव शिवराज पाटील, प्रदेश प्रवक्ते विश्वदिप पडोळ पाटील, प्रदेश सचिव अंकुश देशमुख यांनी केले आहे.