Share this
सिंदखेड राजा (सैय्यद रफिक: बुलडाणा कव्हरेज बातमी)मेहकर येथे दिनांक ०७ मार्च २०२५ रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय मेहकर जि.बुलढाणा येथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासह विविध भागातून आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी जाणून घेतल्या. उपस्थित नागरिकांनी त्यांना भेडसावणारे विविध प्रकारचे प्रश्न मांडले, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव राजा या ऐतिहासिक गावामधील “श्री रेणुकादेवी संस्थान आडगाव राजा” येथील संस्थानाला तीर्थक्षेत “क” दर्जातून “ब” मिळून देण्यास सर्वोतोपरी मदत करेल, आणि संस्थांच्या विकासासाठी निधीला कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी संस्थांचे अध्यक्ष राजे भागवतराव मानसिंगराव जाधव आणि उपस्थित राजे परिवारातील सदस्य कृष्णा राजे, अतिश राजे, संजय राजे,अर्जुन राजे, प्रशांत राजे यांना दिला.
काम करत असताना विकासाच्या बाबतीत मतदारसंघातील नागरिकांचा हाच विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि त्यांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तसेच शासन दरबारी रखडलेले प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी नियमित स्वरूपात ” केंद्रीय मंत्री आपल्या भेटीला – जनता दरबार उपक्रमाचे ” आयोजन करण्यात येत असते.
याप्रसंगी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात, त्याचप्रमाणे सर्वोतोपरी प्रयत्न करत राहणार असल्याचा विश्वास नागरिकांशी संवाद साधत असतानी त्यांनी व्यक्त केला.