Share this
सिंदखेड राजा (अनिल दराडे: बुलडाणा कव्हरेज बातमी) सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील रामदास शंकर गोरे यांचे गट क्रमांक २४४, २४५ व २४६ शेतात बैलगाडी जाण्यासाठी बंद असलेला शेत रस्ता अखेर महसूल विभागाच्या मध्यस्थीने खुला करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की,सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील रामदास शंकर गोरे यांचे गट क्रमांक २४४,२४५ व २४६ या गट क्रमांकाच्या शेतात बैलगाडी जाण्यासाठी रस्ता बंद अवस्थेत पडला होता,त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी शेतातील अन्नधान्य ने आण करण्यासाठी गैरसोय होत होती, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने शासन आणि प्रशासनाने या उत्कृष्ट योजनेचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून त्यावर काम चालू केले त्याचा सकारात्मक संदेश आणि उपयोग शेतकरी यांना होताना दिसत आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणून दिनांक ०७/०३/२०२५ रोजी मौजे हिवरखेड येथे रामदास शंकर गोरे यांचे गट क्रमांक २४४,२४५, व २४६ या गट क्रमांकाच्या शेतात बैलगाडी जाण्यासाठी बंद असलेला शेत रस्ता अखेर शेतकऱ्यांना समुपदेशन केल्यानंतर महसूल विभागाच्या मदतीने,आपसी सहमतीने नायब तहसीलदार डॉ.प्रवीणकुमार वराडे यांच्या मध्यस्थीने आणि पुढाकाराने खुला करण्यात आला. यावेळी संबंधित शेतकरी, पंचमंडळी ग्राम महसूल अधिकारी पवार, बी.जी.साळवे, महसूल सेवक संजय आटोळे हे उपस्थित होते.