Share this

अंढेरा(नंदकिशोर देशमुख: बुलडाणा कव्हरेज बातमी) देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड येथे एका शेतात अफू या अंमली पदार्थाची लागवड केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला न मिळाली. या माहितीच्या आधारे म पथकाने छापा मारला असता एका शेतात अफूची लागवड केली असल्याचे आढळून आले.



क या प्रकरणी आरोपी उध्दव पाटीलबा कायंदे याला अटक करण्यात आली असून त्याच्या मालकीच्या शेतातून २१ किलो ५६ ग्रॅम अफू किंमत १७ लाख २४ हजाराचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थागुशा व देऊळगावराजा पोलीसांनी संयुक्तपणे

केली. याप्रकरणी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंबरखेड शिवारातील गट नं.१२१ ही शेती उध्दव पाटीलबा कायंदे यांच्या मालकीची असून इतर पिकांच्या मधोमध अफू पिकाची लागवड केल्याचे पोलीसांना आढळून आले. ही

कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, अप्पर पोलीस अधिक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि. अशोक लांडे, संतोष महल्ले, संजय मातोंडकर यांच्यासह आदींनी केली.

हे वाचलत का?

error: Content is protected !!