Share this
नगरविकास विभाग आणि गृहविभागाच्या पुरवणी मागणीत आमदारांनी काय मागितले?
नगरपालिकेसाठी जलशुद्धीकरण,तलाव,नविन इमारत तर गृहविभागाकडून चार पोलिस ठाण्यासाठी इमारती आणि वैजापूरसाठी कर्मचारी
गोयगावच्या जलसाठवण तलावात गोदावरीचे पाणी पोहचते यामुळे हा तलाव संपुर्ण कॉंक्रेटीकरण केल्यास किमान सहा महिने पाणी टीकेल यासाठी सुद्धा आमदार बोरनारेंनी मागणी केली आहे
वैजापूर हे शहर महत्वपुर्ण ठीकाण असून नगरपालिका आणि तालुक्याच गांव असल्याच आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी पुरवणी मागणीत म्हटले आहे. 42000 लोकसंख्येच हे शहर असून गेल्या अडीच वर्षांपासून जलशुद्धीकरण प्रकल्प- पाणी फिल्टर प्रकल्प बंद असल्याच गाऱ्हाण मांडत सरकारला विनंती करत वैजापूर नगरपालिकेकरीता नव्याने जल शुद्धिकरण प्रकल्प करावा अशी पहिली मागणी आमदार बोरनारे यांनी केली आहे.

गोदावरी नदीच पाणी जिथे पोहचते त्या गोयगांवच्या जल साठवण तलावाचे कॉंक्रेटीकरण कराव असेही ते म्हटले आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याच्या अंतर्गत जल साठवण तलाव ऊभारल्यास वैजापूरकरांच्या पिण्याच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल अशी मागणी केली आहे.
नगरपालिकेच्या इमारतीत प्रत्येक विभाग वेगवेगळ्या ठीकाणी आहे त्यामुळे नागरीकांची हेळसांड होते.याकरीता नगपालिकेस प्रशासकीय इमारत सरकारच्या माध्यमातून देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी केली आहे.
स्वच्छेतेकडे वेधले लक्ष
पंधरावा वित्त आयोगाचा निधी खाजगी गुत्तेदाराला न देता स्वच्छता कर्मचारी नेमल्यास स्वच्छतेचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरळीत चालेल.म्हणून पालिका स्तरावर स्वच्छता कर्मचारी नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.
वैजापूर पोलिस ठाण्यास शहर आणि ग्रामीण मिळून एकच पोलिस ठाणे असल्याची बाब आमदार बोरनारे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून देत शहर आणि ग्रामीण दोन्ही मिळून एकच पोलिस ठाणे असल्याने 54 गावांची मोठी हेळसांड होतेे. याकरीता
वैजापूर शहरासाठी आणि ग्रामीणसाठी स्वतंञ पोलिस ठाणे करण्यात यांव असेही ते म्हणाले.वैजापूर ग्रामीणच्या 54 गावच पोलिस ठाणे वेगवेगळे करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
मतदारसंघात चार पोलिस ठाणे चारही पोलिस ठाण्यांची अवस्था बदलण्यासाठी नविन इमारती द्याव्यात अशी मागणी केली आहे.ज्यात प्रामुख्याने शिऊर,विरगांव,शिल्लेगांव आणि वैजापूर या चार पोलिस ठाण्यांचा सहभाग आहे.तर यात मुख्यत: वैजापूर पोलिस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने मोडकळीस आलेली आहे.ही इमारत कधी खाली कोसळेल सांगता येत नाही त्यामुळे अतितात्काळ या मुद्द्यावर गृहविभागाने चारही पोलिस ठाण्यांच्या इमारती नव्याने मंजूर कराव्यात अशी मागणी आमदार प्रा बोरनारे यांनी केली आहे.
याशिवाय वैजापूर पोलिस ठाण्यात वैजापूरचा कारभार पहाण्यासाठी अतिशय कर्मचारी कमी असल्याने वैजापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी असेही बोरनारे यांनी सांगत कर्मचारी वाढविण्याची मागणी केली आहे. यांसह अन्य महत्वपुर्ण मुद्दे नगरविभाग व गृहविभागाच्या अंतर्गत असलेल्या विशेष पुरवणी मागणीत आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी मांडले आहेत.