Share this
साखरखेर्डा (समाधान सरकटे:बुलढाणा कव्हरेज बातमी):येथील सरपंच सुमनताई जगताप ह्या आपल्या सरपंच पदाचा राजीनामा मंगळवारला गटविकास अधिकारी यांना सादर करणार आहेत . दोन वर्ष ९ महिने त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार व्यवस्थित सांभाळीत अनेक विकासात्मक कामे करुन एक विकासाचे व्हिजन दिले आहे . त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून जनतेतून मागणी होत असली तरी ठरलेल्या कालावधीची पुर्तता म्हणून त्या राजीनामा देत आहे .
साखरखेर्डा ग्रामपंचायत निवडणूक फेब्रुवारी २१ मध्ये झाली . त्यावेळी भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी युती करुन शिवसेना नेते रविंद्र पाटील यांना लढत दिली होती . त्यात राष्ट्रवादी काँग्रेस या युतीचा विजय होऊन १६ सदस्य निवडून आले होते . सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आणि महिले एक वर्ष मला मिळावे म्हणून दाऊद कुरेशी यांनी हट्ट धरला . डॉ राजेंद्र शिंगणे त्यावेळी मंत्री असल्याने त्यांनी दाऊद कुरेशी यांना हिरवी झेंडी दिली . ११ फेब्रुवारी २०२१ रोजी दाऊद कुरेशी यांनी कारभार हाती घेतला . त्यांनी एक वर्षा ऐवजी चक्क दिड वर्ष कारभार केला . त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुमनताई सुनील जगताप यांना २७ जून २२ रोजी सरपंच पदाचा कार्यभार हाती घेतला . आपल्या कारकीर्दीत गावातील रस्ते , भुमिगत नाली , पाणीपुरवठा अशी विकासात्मक कामे करुन जनतेची मने जिंकली . त्यांनी केलेल्या सहकाराच्या माध्यमातून गावातील नागरिकांनी राजीनामा देऊ नये आणि सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण करावा अशी मागणी अनेकांनी त्यांच्याकडे केली . परंतू राजकीय समीकरणे लक्षात घेऊन त्यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे . त्यांच्या नंतर कोण सरपंच होणार ही नावे गुलदस्त्यात असली तरी माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे सांगितलं तोच सरपंच पदासाठी अर्ज दाखल करेल हे निश्चित आहे . १६ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये अनेकांना सरपंच व्हावे असे वाटत असले तरी रंगपंचमीचा रंग कोणाच्या अंगावर पडेल यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे .