Share this
चिखली(बुलडाणा कव्हरेज बातमी):अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीत तीन लाख चौऱ्यांशी हजाराच्या लोखंडी साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली’च्या शेळगाव आटोळं भागात अशोका बिल्डकॉन लिमिटेड पॉवर हाऊस कंपनीमध्ये कामकाजासाठी ३२ लोखंडी पोल किंमत अंदाजे तीन लाख चोऱ्यांशी हजार रुपयांचा माल कोण्यातरी अज्ञात चोरट्यांनी २० फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान चोरून नेला आहे.अशी तक्रार गजानन मनोहर धंदर (४७) यांनी अंढेरा पोलिसात दिली आहे. पुढील तपास पीएसआय सुरेश जारवाल करीत आहेत.