Share this
अंढेरा(बुलडाणा कव्हरेज बातमी):कर्जपणाला कंटाळून एका 35 वर्षीय तरुणाचा आत्महत्या केल्याची घटना अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणखेड येथे 11 मार्च रोजी उघडकीस आली. नरहरी बनसोडे उर्फ बाळु असे आत्महत्या केलेल्या युवकाची नाव आहे. बनसोडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्याच्या वर एका खाजगी पतसंस्थेच्या लाख रुपयाची कर्ज होते. कर्जाची परत फेड शक्य नसल्याने अनेक दिवसा पासून आर्थिक विवेचंनेत होते. याशिवाय त्यांना हफ्ते थकीत असल्याची नोटीस बजावण्यात आली होती. दुसरी कडून शेती मध्ये शेतमाल होत नव्हता त्यामुळं हप्ते फेडणार कसे?हा प्रश्न त्यांच्या समोर होता. अखेर आर्थिक संकटातून त्यांनी टोकाची भूमिका पाऊल घेतले आहे.शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पाश्चात दोन लहान मुले आई पत्नी असा परिवार आहे..