Share this
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज):देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील सरकार पुरस्कार प्राप्त तरुण शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या सरकारी व्यवस्थेचा बळी असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांला आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी क्रांतीकरी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
खडकपुर्णा धरण उशाशी असताना या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.त्यामुळे हाती आलेली पीक शेतकऱ्यांना गमवावे लागतात त्यासाठी डिसेंबर महिन्यात या शेतकऱ्यांने शिवणी आरमाळच्या धरणावर उपोषण केले होते.आम्हाला खडकपुर्णा धरणाचे पाणी द्या आणि सदर धरणाच्या काठावरील वनस्पती काढून टाका ह्या रास्त मागण्या होत्या पण त्याही पूर्ण केल्या नाहीत.
पोटतिडकीने गेली कित्येक वर्षांपासून हा लढा हा शेतकरी देत असताना कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने सदर शेतकऱ्यांने आपला जीव गमावला.असा आरोप तुपकर यांनी केला.
सोयाबीनला भाव नाही,कापसला भाव नाही.आणि २०२३ मधील पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही.सरकार कर्जमाफी देणार होते ती सुद्धा दिली नाही शेतकरी जीवावर उदार का झाला हजारो शेतकरी जीवन संपवत आहे त्याबद्दल सरकारला काहीच वाटत नाही.
सद्या विधानसभेत अधिवेशन सुरू आहे फालतू गोष्टीवर चर्चा होते मात्र शेतीवर अवलंबून असलेल्या ७० टक्के या राज्यातील शेतकरी समाजाच्या अडचणींवर कोण्हीच एक शब्द बोलायला तयार नाही.येथुनपुढे कैलास नागरे सारखी इतर शेतकऱ्यावर वेळ येऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी.
आपण नागरे यांच्या गावी जाऊन सदर कुटूंबाची भेट घेणार आहोत आणि कर्जमाफीचा लढा कैलास नागरे यांच्या गावापासून तीव्र करणार असल्याचे तुपकर म्हणाले.१९ मार्चला सरकारला जाब विचारण्यासाठी आपण मुंबईला जाणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.