Share this



बुलडाणा ( बुलडाणा कव्हरेज बातमी)शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बुलडाणा जिल्हा चे  क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणाचे  नवं नियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना मेहकर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एक वर्षासाठी तडीपार केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यासह लगतच्या सर्व जिल्ह्यातून म्हणजेच अकोला, वाशिम, जालना, छ.संभाजीनगर, जळगाव, बऱ्हाणपूर आणि इतर शेजारील जिल्ह्यांमध्ये त्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राजकीय दबाव टाकून करवून घेतली आहे. डॉ. टाले यांनी गेल्या १३ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आहे. अहोरात्र झटणाऱ्या या माणसाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलं आहे. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझ्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रतापराव जाधव यांना याच गोष्टीचा राग होता आणि म्हणूनच मंत्री पदाचा दुरुपयोग करून प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्यावर ही तडीपाराची कारवाई लादली गेली आहे.

खरं पाहता, डॉ. टाले यांच्यावरचे गुन्हे हे आंदोलनातील आहेत. शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह करताना त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्यात आल्या. आज गुंड, भ्रष्टाचारी दोन नंबर वाले मोकाट फिरत असताना शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला तडीपार केलं जातंय. हा कुठला न्याय? इंग्रजांच्या काळात जसं सत्याग्रहींवर अन्याय होत असे, तसंच आज होतंय. प्रशासनातील काही अधिकारी राजकीय दबावाला झुकत आहेत, मंत्री प्रतापराव जाधवांच्या गुलामीत वागत आहेत.

पण आम्ही न घाबरणारे, न झुकणारे आहोत!
डॉ. टाले यांच्यासोबत मी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण क्रांतिकारी शेतकरी संघटना उभी आहे. ही तडीपाराची कारवाई म्हणजे शेतकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न आहे, पण आम्ही आमचा लढा थांबवणार नाही. शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत राहू. प्रतापराव जाधव, इतक्या प्रयत्नांनी आम्हाला संपवता येईल असं वाटत असेल, तर तो तुमचा भ्रम आहे.आमच्या चळवळीला दडपण्याचा तुमचा डाव कधीही यशस्वी होणार नाही.असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया वर पोस्ट केली आहे.

हे वाचलत का?

error: Content is protected !!