Share this

सिंदखेडराजा : (रफीक सैय्यद: बुलढाणा कव्हरेज बातमी)देऊळगाव राजा तालुक्यातील डॉ.रामदास शामराव शिंदे यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ‘पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या नीती आयोग, मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय) तसेच डॉ. मनीभाई देसाई प्रतिष्ठान, राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता आणि समाजसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो.
डॉ. रामदास शिंदे यांनी आपल्या जीवनातील अनेक वर्षे सामाजिक क्रांती, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजहिताच्या कार्यासाठी समर्पित केली आहेत. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात एक प्रेरणादायी आणि आदर्शवत व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी आणि समाजातील लोकांना सेवाभावी कार्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
या गौरवाबद्दल डॉ. शिंदे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

हे वाचलत का?

error: Content is protected !!