Share this
अंढेरा(नंदकिशोर देशमुख: बुलडाणा कव्हरेज बातमी)अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग, पोलिस विभाग, परिवहन विभाग, खडकपूर्णा प्रकल्प विभाग यांनी संयुक्तपणे जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने शोध मोहीम हाती घेतली आहे. ६ मार्च रोजी दिवसभर ही कार्यवाही सुरू होती. काही बोटी मराठवाडा शिवारात जाफ्राबादकडे पळून गेल्या. शेवटी मौजे चिंचखेड शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन फायबर बोटी व दोन इंजिन बोटी अशा एकूण पाच बोटी पकडण्यात आल्या. त्यांना किनाऱ्यावर आणून स्फोटके लावून उडवण्यात येऊन त्याही नष्ट करण्यात करण्यात आले.
सदर बोटी किनाऱ्यावर लावणे व त्यानंतर जिलेटिनच्या साहाय्याने उडवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी.लागली. शेवटी सर्व अडचणींवर मात करत बोटी उडविण्यात यश आले. ही कार्यवाई उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शन तथा उपस्थितीत पार पडली. या वेळी मा तहसीलदार वैशाली तहसीलदार डोंगरजाळ, संतोष नायब मुंडे, तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, सागर देशपांडे, सुमित जाधव, संजय बरांडे, तेजस शेटे महसूल सेवक काकडे व हरने यांसह परिवहन विभागाचे अधिकारी परिवहन निरीक्षक प्रतीक रोडेव सहकारी, खडकपूर्णा प्रकल्प उपविभागाचे अधिकारी एस.जे. तल्हार व सहकारी, शोध व बचाव पथक मोहीमेचे पवार व त्यांचे सहकारी यांनी केली. ही कारवाई रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती.
देऊळगाव राजा तालुक्यातील खडक पूर्णा नदीच्या पात्रात शेकडो वाळू उपसा सुरू आहे . एक ते दोन वर्षा पासून अवैध वाळू उपसा सुरू आहे . त्यावर प्रशासन थातुर मातुर कारवाई केली जाते.धातुर मातुर कारवाई करून परत काही दिवसांनी रेती उपसा सुरू होतो.त्यामुळं जे उपसा करतात त्यांना नोटीस देऊन कडकं कारवाई केली जावी!
संतोष भुतेकर
युवा सेना उपजिल्हा प्रमुख बुलडाणा