Share this

अंढेरा(नंदकिशोर देशमुख:बुलडाणा कव्हरेज बातमी):देऊळगाव मही येथील स्थानिक श्री शिवाजी विद्यालय येथे आज दिनांक 09 मार्च 2025 ला, शैक्षणिक सत्र 1999 2000 ला शिकत असलेल्या वर्ग दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळा मेळावा आनंदात साजरा  झाला. धकाधकीच्या जीवनातील वेळेत वेळ काढून माजी विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपासून आपल्या विखुरलेल्या सर्व मित्रांचे नंबर मिळून एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला. सदर ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या शालेय जीवनातील चर्चा सुरू झाल्या., जुन्या आठवणींना उजाळा देत देत त्यांना एक कल्पना सुचली ती म्हणजे गेट-टुगेदर ची! गेट्स टुगेदर च्या कल्पनेतून सर्व विद्यार्थी आज दिनांक नऊ मार्च 2025 रोजी आपण शिकलेल्या श्री शिवाजी विद्यालय येथे एकत्र जमले. पुन्हा एकदा पंचवीस वर्षांनी शाळा भरली. विशेष म्हणजे नागपूर पर्यंत असलेले माजी विद्यार्थी सदर मेळाव्यास हजर राहिले. एवढेच नव्हे, तर गावातील ऐन्शीतील सेवानिवृत्त शिक्षकवृंद व पूर्व विदर्भात बदली झालेले शिक्षक सुद्धा मेळाव्यास हजर राहिलेत.
    सविस्तर वृत्त असे की, स्थानिक देऊळगाव मही येथील श्री शिवाजी विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 1999 2000 मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी,शिकत असलेल्या शाळेतील, त्याच खोल्यांमध्ये एकत्र जमून, पुन्हा एकदा पंचवीस वर्षांनी शिक्षणाचे धडे घेतले. तसेच प्रश्नोत्तराचा तास सुद्धा झाला. चुकलेल्या विद्यार्थ्यांनी हातावर छड्या सुद्धा खाल्ल्या. अगोदर, रीतसर राष्ट्रगीत झाले, नन्तर पेंडल मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आजी माजी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देत भावुक झाले होते. तर, कोणाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ही वगळले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन झाले. यावेळी पऱ्हाड सर, तवर सर,उबरहंडे सर, भिसे सर, चोथे सर, गवई सर, राणे सर, नागरे सर, वायाळ सर, मेहेत्रे सर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष स्थानी दंदाले सर हे होते. प्रास्ताविक संभाजी शिंगणे यांनी तर, सूत्रसंचालन गजानन शिंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, माजी विद्यार्थी संभाजी शिंगणे, नितीन शिंगणे, मंदार जोशी, संदीप भिसे, सुभाष बकाल, सचिन हिवाळे, प्रदीप शिंगणे, फेरोज मन्सूरी, शेख खुद्दूस, रावसाहेब सरोदे, कचरूबा शेजूळ, राजू शेरे, सांडू झगरे, प्रकाश राऊत, रामा शिंगणे, गजानन बोंबले, रामा शिंगणे फोटो, भारत चित्ते, सिद्धू गिते,सचिन शिंगणे, विष्णू भुतेकर, मुकुंद शिंगणे, विशाल उबरहन्डे, सुरेश शिंगणे, दीपक डोईफोडे, वसंता शिंगणे, शिवाजी टाले, दीपाली पारिख, स्मिता देशमुख, गोदावरी नागरे, निलीमा राजापूरे, वनिता शिंगणे, पुष्पा शिंगणे, प्रिया कोटेचा, दीपाली शिंगणे, ज्योती निठवे, सुनीता शिंगणे, पुंजाबाई शिंगणे व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

हे वाचलत का?

error: Content is protected !!