Share this
सिंदखेडराजा(अनिल दराडे: बुलडाणा कव्हरेज बातमी):उपविभागीय अधिकारी यांच्या संकल्पनेतुन,
तहसीदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाचे ग्रामस्थ दिनी अनेक प्रश्न निकाली!
सिंदखेडराजा : सिंदखेड राजा तालुक्याती आज दिनांक १२/०३/२०२५ रोजी ग्रामस्थ दिनाचे वसंत नगर येथे उपविभागीय अधिकारी यांच्या संकल्पनेतून व अजित दिवटे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
ग्रामस्थ दिन साजरा करतांना वसंत नगर गावचे सरपंच सुभाष जाधव,ग्रामसेवक रामेश्वर मेहेत्रे,कृषी सहाय्यक झोरे,ग्राम महसूल अधिकारी संजय चव्हाण,सेतूधारक परमेश्वर पवार आणि सर्व संबंधित कर्मचारी तसेच गावातील नागरिक श्याम जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष मोहन पवार,माजी सरपंच,शेतकरी तरुण यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमांतर्गत ग्रामस्थांना ॲग्रीस्टॅक,घरकुल योजना,महसुल विषयक समस्या,ग्रामपंचायत,
पाणीपुरवठा,पुरवठा विभाग, संजय गांधी योजना,सामाजिक दातृत्व योजना जिवंत सातबारा,घरकुल योजना,शेतकरी आत्महत्या कुटुंब समस्या,शैक्षणिक योजना या योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमादरम्यान गावातील सिमेंट रोडच्या तक्रारी,अडवलेले पांदण रस्ते,शैक्षणिक योजना इत्यादी बाबत ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या समस्या तालुका दंडाधिकारी यांनी जाणून घेतल्या व त्यावर मार्गदर्शन केले असून संबंधित विभागाचे ग्रामसेवक व तलाठी यांना सूचना देऊन, नागरिकांना त्यांच्याकडून कामे करून घेण्यास सांगितले.ज्या ठिकाणी काही समस्या असतील तेथे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पांदण रस्ते खुले करून दिले असता, प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न उपस्थित नागरिकांसमोर सामंजस्याने मार्गी काढला असून सुधाकर देशमुख व नंदू देशमुख यांनी १४ फूट रस्ता देण्याचे मान्य केले तेव्हा त्यांचे सर्व नागरिकांनी कौतुक केले.