Share this
सिंदखेडराजा(अनिल दराडे: बुलडाणा कव्हरेज बातमी): सिंदखेड राजा येथे आज ०८/०३/२०२५ रोजी विदर्भ पटवारी संघ नागपूर -२ उपविभाग शाखा सिंदखेड राजा ची वार्षिक आमसभा तलाठी गजानन टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुगळादेवी देवस्थान देऊळगाव राजा येथे खेळीमेळीचे वातावरणात पार पडली असून सदर सभेस जिल्हा अध्यक्ष श्री. विजेंद्र धोंडगे, श्री.शिवानंद वाकदकर जिल्हा सचिव, रमाकांत माकोने माजी जिल्हा सचिव, सिंदखेराजा उपविभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
आमसभेमध्ये अध्यक्षपदी श्री आनंद राजपूत,उपाध्यक्ष श्री. विलास कटारे,सचिव पदी श्री. वसुदेव जायभाये यांची सर्वानुमते बिनविरोध
निवड करण्यात आली. निवड झालेले पदाधिकारी यांचे जिल्हाध्यक्ष श्री.विजेंद्र धोंडगे, जिल्हासचिव श्री.शिवानंद वाकदकर यांनी व उपस्थीत तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. शिवानंद सानप यांनी केले.