Share this
देऊळगावराजा(सय्यद रफिक:बुलडाणा कव्हरेज बातमी):देऊळगाव राजा शहरातील बालाजी नगर येथील महिलांनी (दिनांक 10 मार्च 2025) देऊळगाव राजा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मोकळ यांना निवेदन सादर करत नळाला नियमित पाणीपुरवठा न होण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले.
महिलांनी निवेदनात म्हटले आहे की, देऊळगाव राजा शहरापासून जवळच असलेले खडकपूर्णा धरण हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असून त्यातून बुलडाणा येथे नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र, देऊळगाव राजा शहराला अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नाही. महिन्यातून एक किंवा दोन वेळा पाणीपुरवठा केल्या जातो
18 ते 20 दिवसांतून एकदाच येणारे पाणी हे देखील अनियमित वेळेला येत नाही तसेच कमी प्रमाणात येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. नळाला पाणी सोडण्याची पाणीपुरवठ्याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने नागरिकांची तारांबळ उडते. अनेक नागरिक सकाळीच कामानिमित्त बाहेर पडतात, महिलादेखील शेतकामासाठी किंवा इतर ठिकाणी कामा निमित्त बाहेर जातात दुपारच्या वेळी अचानक आलेले पाणी भरता येत नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
महिलांनी यावेळी नवीन पाईपलाईनवरही प्रश्न उपस्थित केला. नवीन पाईपलाईनमुळे शहरातील व अनेक गल्री स्त्यांची मोठी दुर्दशा झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत.अशी जनतेत चर्चा आहे की नवीन पाईपलाईन पेक्षा पूर्वीची पाईपलाईन चांगली होती कमीत कमी नळाला पाणी भरपूर प्रमाणात मिळत होते. तसेच नळाला येणारे पाणी अनेकदा अत्यंत गढूळ असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित पाणीपुरवठा तर होत नाहीच, त्यातही मिळणारे पाणी अशुद्ध असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
महिलांनी मागणी केली की, नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा आणि पाणी स्वच्छ व फिल्टर करूनच नागरिकांना देण्यात यावे.
यावेळी उपस्थित महिला सौ. अनिता पंडित, सौ. प्रतिभा खंडागळे, सौ. सीमा दंदाले, सौ. शिवाली सोनुणे, सौ. सपना शितल भुरावत, सौ. मंगल सोसे यांच्यासह बालाजी नगरमधील अनेक महिला उपस्थित होत्या.
“आम्हाला शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा हीच आमची मागणी आहे.