Share this
सिंदखेडराजा(सय्यद रफिक: बुलडाणा कव्हरेज बातमी):सिंदखेडराजा शहरात नगरोत्थान अभियाना अंतर्गत भूमिगत गटारी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे तसेच इस्टिमेट प्रमाणे होण्यासाठी अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी मागणी केली आहे परंतु त्यांच्याकडे संबंधित विभागाने फारस लक्ष दिले नाही. झालेल्या कामाची सखोल चौकशी होऊन गुणवत्ता तपासली गेली पाहिजे तरच आपले कामाची सत्यता समोर येईल. त्याचप्रमाणे संपूर्ण कामाचा आराखडा देखील काय आहे हा जनतेसमोर ठेवण्यात यावा,याची मागणी अनिल दराडे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना जिजामाता विकास संघर्ष समीती च्या वतीने करण्यात आली.
मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे भूमिगत गटारी योजनेला नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ५९ कोटी ६४ लाख मंजुरात मिळाली असून,
सिंदखेडराजा नगरीतील जिजामाता नगर मध्ये या योजनेतून कामे सुरू झालेली आहे,परंतु कामाचा दर्जा व गुणत्ता याकडे लक्ष दिल्या जात नाही,
त्यामुळे नागरिक घरासमोर काम करू देण्यास नकार देत होते असे निदर्शनास आले आहे.सदर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, या कामाची गुणवत्ता तपासली जावी जेणेकरून सत्य समोर येईल.
मंजुरात कामे एस्टिमेटप्रमाणे व विकास आराखड्याप्रमाणे काम करणे बंधनकारक असते.
चालू असलेल्या कामाचा कालावधी किती दिवसाचा, या योजनेत वापरलेले पाईप कोणत्या कंपनीचे व पाईपाची साईज,पाईपाचा गेज, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात परंतु तसे होताना दिसत नाही.ज्या ठिकाणी रोड फोडून कामे झाली आहे तेथे रोड दुरुस्ती कशी करणार ? किंवा नवा रोड तयार करणार का ? याबाबत देखील अस्पष्टता जाणवत आहे.याबाबत संपूर्ण माहिती मिळणे सामान्य जनतेला फार गरजेचे आहे.
आपणास जिजामाता विकास संघर्ष समिती या निवेदनाद्वारे सांगू इच्छिते की,भूमिगत गटारी योजनेचा कामाचा आराखडा स्पष्ट लेखी स्वरूपात समोर यायला हवा त्याचप्रमाणे इस्टिमेट देखील देण्यात यावे. झालेल्या सदर कामात अनियमितता आढळल्यास कारवाई होणे अपेक्षित आहे त्या संदर्भात आपण कोणते पावले उचलणार आहात ते देखील स्पष्ट लेखी स्वरूपाची मागणी विकास संघर्ष समीती यांनी केली आहे.
वरील प्रमाणे निवेदनात नमूद मागण्या तात्काळ मान्य करून पूर्तता करण्यात यावी अन्यथा विकास संघर्ष समीतीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अनिल दराडे (सिंदखेडराजा विकास संघर्ष समिती) यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनद्वारे दिला आहे.